Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फसवणुकी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 22 June 2024, 16:02
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

पुणे : मौजे वडगाव बुद्रुक येथील एका साडेचार गुंठे जागेवर बनावट कागदपत्रे वापरून बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आढळल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पालवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी ३० मे रोजी प्रकाश भगवान आव्हाड आणि प्रसाद मोहन मोरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सह दुय्यम निबंधक अमृता योगेश बनकर यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव बुद्रुक येथील एका साडेचार गुंठे जागेवर हुशारे कॉम्प्लेक्स या नावाने बेकायदा इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमधील विविध सदानिकांच्या खरेदी विक्री संदर्भातील दस्त नोंदविण्यात आले होते. या व्यवहारात बनावट कागदपत्रे वापरण्यात आली होती. याबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रार अर्जाची चौकशी करून पुणे महापालिकेकडून अहवाल प्राप्त करून घेण्यात आला होता. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी गुंठेवारी नियमितीकर दाखला जोडण्यात आला होता. त्यांची पडताळणी करण्यात आली.

मात्र, दाखल्याची कोणतीही नोंद पुणे महापालिकेच्या अभिलेखात आढळून आली नाही. हा नियमितीकरण दाखला बनावट असल्याचे तपासात आढळून आले. हा बनावट दाखला जोडून शासनाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी प्रतिभा रियाल्टर्स तर्फे भागीदार आणि मान्यता देणार यांच्यातर्फे कुलमुखत्यार असलेले प्रकाश भगवान आव्हाड, प्रसाद मोहन मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, २०१८ मध्ये दिनेश समुद्रे नावाच्या व्यक्तीवर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा तपासाकरिता पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्याकडे होता. दरम्यान, २०२० साली समुद्रे यांच्यावर ‘एमपीआयडी’ अन्वये कारवाई करण्यात आली होती. सोनवणे याचा भाचा मोरे आणि मेहुणा आव्हाड या दोघांनी समुद्रे यांच्या मुलासोबत भागीदारी केली.

वडगाव बुद्रुक येथील जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या बांधकाम कंपनीत मोरे आणि आव्हाड यांनी भागीदारी घेतली. त्यानंतर दोन महिन्यांनी समुद्रे यांच्या मुलाने ही भागीदारी सोडली आणि त्याचे ‘रिटायरमेंट अॅग्रिमेंट’ केले. या गुन्ह्याच्या तपासात सोनवणे यानेच पालवेच्या मदतीने मोरे आणि आव्हाड यांच्यासाठी हा सर्व प्रकार केला असल्याचे समोर आले असल्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पुढील तपास अलंकार पोलिसांकडून सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर! कोर्टाचं कामकाज ठप्प ; न्यायदान प्रक्रियेला मोठा फटका

Tuesday, 17 November 2026, 14:21

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45
Next Post
FIR registered against youth for blackmailing and exploiting girl in pune

Loni Kalbhor News : मोबाईलमधील मैत्रिणीचे न्यूड फोटो मित्रांना दाखवले, अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp