Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 November 2026, 13:58

डॉ. अशोक बालगुडे

पुणे, दि. १७ : शहराच्या चौकाचौकांत, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या छतांवर अनधिकृत होर्डिंगचे जाळे विस्तारत असताना पुणे महापालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाही होर्डिंगवर कारवाई झालेली नाही. आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२६ या सात महिन्यांत संपूर्ण शहरात केवळ ७८ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्यात नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने २२ होर्डिंग हटवून आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सात कार्यालयांची कामगिरी शून्य असल्याने अनधिकृत जाहिरात फलकांविरोधातील महापालिकेच्या कारवाईचा प्रभाव किती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सात कार्यालयांत कारवाईच नाही!

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी शिवाजीनगर-घोले रोड, कोथरूड-बावधन, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, विश्रामबाग-वाडा आणि कसबा-भवानी पेठ या सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झालेली नाही. बिबवेवाडी कार्यालयाने केवळ एका, औंध-बाणेरने तीन, तर कोंढवा-उंड्री आणि ढोले पाटील कार्यालयांनी प्रत्येकी पाच होर्डिंग हटविली. त्यामुळे काही कार्यालयांतील कारवाईची गती आणि इतर कार्यालयांतील निष्क्रियता यांतील तफावत स्पष्ट झाली आहे.

नगर रोडची सर्वाधिक कारवाई

सात महिन्यांच्या कालावधीत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने २२ अनधिकृत होर्डिंग हटविली. शहरातील एकूण ७८ कारवायांपैकी हा सर्वाधिक आकडा आहे. मात्र, उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कारवाईचा वेग अत्यंत कमी अथवा शून्य राहिला आहे. या आकडेवारीमुळे अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिमेचे नियोजन आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या जबाबदारीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

बॅनर, पोस्टरवर कारवाई; होर्डिंगचे काय?

महापालिकेने अनधिकृत जाहिरात साहित्याविरोधातही कारवाई केली आहे. या सात महिन्यांत १५ हजार ४६४ बॅनर, पाच हजार ८५३ पोस्टर, तीन हजार ३२३ झेंडे, तीन हजार २८४ किऑक्स आणि १९२ फ्लेक्स हटविण्यात आले. मात्र, मोठ्या आकाराच्या होर्डिंगविरोधातील कारवाईचा आकडा तुलनेने कमी आहे.

परवानगी आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शहरात होर्डिंग उभारण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अधिकृत होर्डिंगवर महापालिकेचा परवाना क्रमांक आणि जाहिरात एजन्सीचे नाव असलेला पिवळा फलक लावणे आवश्यक आहे. परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण तसेच आवश्यक संरचनात्मक सुरक्षा तपासणीही बंधनकारक आहे.

मात्र, परवानगीविना उभारलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सात क्षेत्रीय कार्यालयांनी सात महिन्यांत एकही होर्डिंग हटविले नसल्याचे चित्र आहे. अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण, महापालिकेच्या महसुलाचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना प्रशासन केवळ आकडेवारीपुरते सक्रिय राहणार की प्रत्यक्ष कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45

दौंड येथे कल्याण मटक्यावर पोलिसांची धडक कारवाई! एकाच दिवशी चार ठिकाणी छापे, 8 जणांवर गुन्हे दाखल

Tuesday, 17 November 2026, 13:44

आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरने तोडले नाते! मृत्यूनंतरही स्वीकारला नाही मृतदेह; नेमकं प्रकरण काय? वाचा

Tuesday, 17 November 2026, 13:11

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 13:08

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Tuesday, 17 November 2026, 12:56
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp