Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी निशांत राहुल काळभोर याने १९ वर्षाखालील ७९ किलो वजन गटात सिल्वर पदक पटकावले आहे. तर विद्यालयाचा विद्यार्थी राजवीर उंद्रे याने जलतरण स्पर्धेत तर विश्वजीत पठारे याने फ्रीस्टाइल या स्पर्धेत सिल्वर पदकाची कमी केली आहे. अशी माहिती ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रिपल शर्मा यांनी दिली आहे.
कॉलेजतर्फ़े शुभेच्छांचा वर्षाव
वडकी (ता. हवेली) येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत निशांत काळभोर याने ७९ किलो वजन गटात सिल्वर पदावर समाधान मानावे लागले आहे. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत राजवीर उंद्रे याने बेस्ट स्ट्रोक ५० मीटर व १०० मीटर सिल्वर पदक प्राप्त केले. (Loni Kalbhor) तर विश्वजीत पठारे याने फ्रीस्टाइल पन्नास मीटर सिल्वर पदक आणि बेस्ट स्ट्रोक ब्राँझ पथक प्राप्त केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक ज्योतीराम कौलगे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, हवेली तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. (Loni Kalbhor) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य रिपल शर्मा यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..
Loni Kalbhor : थेऊरसह मोरगाव व सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीची माहिती वेबसाईटवर मिळणार