Loni Kalbhor News : लोणी काळभोर : शहरी स्वच्छता आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने भारत सातत्याने प्रगती करत आहे. वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने आमचे लक्ष रुग्णांच्या गरजा आणि कल्याणावर केंद्रित आहे. विश्वराज केवळ आरोग्यसेवा संस्था नाही, तर हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीचा अविभाज्य भाग आहे. असे प्रतिपादन डॉ. अदिती कराड यांनी केले आहे.
लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी (ता.१५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. अदिती कराड यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन डॉ. अदिती कराड यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी परेड करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अदिती कराड म्हणाल्या, शहरी स्वच्छता आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने भारत सातत्याने प्रगती करत आहे. वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने आमचे लक्ष रुग्णांच्या गरजा आणि कल्याणावर केंद्रित आहे. विश्वराज केवळ आरोग्यसेवा संस्था नाही, तर हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीचा अविभाज्य भाग आहे. असेही डॉ. अदिती कराड म्हणाल्या.
तसेच दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आमच्या सहकारी, नागरिकांच्या कल्याणासाठी आमचे समर्पण प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी मुक्त आणि समृद्ध भारताचा पाया घातला. त्याचप्रमाणे आम्ही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देऊन निरोगी आणि आनंदी राष्ट्रासाठी योगदान देत आहोत. सावधगिरीच्या उपायांबद्दल लोकांना प्रबोधन करण्याच्या महत्त्वावर जोर देऊन, प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे. या विश्वासाला विश्वराज हॉस्पिटल ठामपणे कायम ठेवते, असेही डॉ. अदिती कराड यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम…
भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी डोळ्यांचा संसर्ग आणि विषाणूजन्य रोग जनजागृतीसंबंधी ३ हजार हून अधिक पत्रकाचे वाटप केले. तसेच, या उपक्रमाचे प्रचलित आरोग्य परिस्थितींबद्दल लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते.