Loni Kalbhor News , लोणी काळभोर : खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर तलवारीचा धाक दाखवून उभे चिरण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उरुळी देवाची (ता. हवेली) गावाच्या स्मशानभूमीजवळील ओढ्याजवळ शनिवारी (ता. २६) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका गुंडाला अटक केली आहे.
उरळी देवाची येथील घटना
सनी मोहन शेवाळे (वय २५, रा. उरुळी देवाची, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे साथीदार प्रसाद भाडळे व आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Loni Kalbhor News) याप्रकरणी अमोल रत्नाकर वाजे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाजे हे खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करत होते. आरोपी सनी शेवाळे हा त्यांच्याकडे आला आणि आरोपीने तलवारीचा धाक दाखवून वाजे यांना उभे चिरण्याची धमकी दिली. (Loni Kalbhor News) तसेच वाजे यांना पाईपलाईनचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर आरोपी प्रसाद भाडळे व त्याच्या साथीदाराने वाजे यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी तेथे लोक जमले होते. तेव्हा आरोपी सनी शेवाळे याने हातातील तलवार व दांडके हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई असून, कोणी मध्ये आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.
याप्रकरणी अमोल वाजे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सनी शेवाळेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Loni Kalbhor News) गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सनी शेवाळे याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, उरुळी कांचन येथे हार्बर सोसायटी संस्थेकडून वाहतूक सुरक्षा जनजागृती