Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा लोणी काळभोर (ता. हवेली) गावात परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार असल्याची माहिती प्रांतअधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे. प्रांताधिकारी संजय आसवले यांच्यासोबत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती येथील ग्रामस्थ, व संत तुकाराम महाराज पालखीचे विश्वस्त यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत हा तोडगा निघाला आहे. यामुळे लोणी काळभोर व विठुरायाच्या भक्तांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. ( Sant Tukaram Maharaj” Palkhi will stay at Vitthal temple in Loni Kalbhor; Solution in the meeting with Provincial Officer Sanjay Asawale..)
विठुरायाच्या भक्तांसाठी ही आनंदाची बातमी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून यादरम्यान चा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये १४ जूनला पालखी लोणी काळभोर गावात थांबणार का कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी मार्गावर थांबणार याकडे संपूर्ण पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. (Loni Kalbhor News) अखेरीस पालखी हि लोणी काळभोर गावात मुक्कामासाठी थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालखी सोहळ्याबाबत यशस्वी तोडगा काढण्यासाठी प्रांतअधिकारी संजय आसवले, गट विकास अधिकारी भूषण जोशी, पालखी सोहळा समितीचे संजय मोरे, अजित मोरे, भानुदास मोरे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, (Loni Kalbhor News) लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे, शिवसेनेचे संतोष भोसले, सुभाष काळभोर, राजकुमार काळभोर, माऊली काळभोर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वारकरी संप्रादायाचा, श्रध्देचा व परंपरेचा विचार करुन काही बदल करुन सोहळा संपन्न करण्याचा निर्णय घेतला. प्रशासन सुसज्ज व्यवस्था निर्माण करणार असल्याचा विश्वास देऊन ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वयातून सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगितले. (Loni Kalbhor News) अखेर प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मागणीचा विचार करुन सोहळा समितीने लोणी काळभोरला पालखी सोहळा विठ्ठल मंदिर मुक्कामासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्याबाबत यशस्वी तोडगा काढण्यात प्रशासनाने यश मिळविले आहे. (Loni Kalbhor News) पालखी सोहळा लोणी काळभोर गावात मुक्कामासाठी थांबणार असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.