Loni Kalbhor News : लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाला प्रतिसाद देत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती. तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.(Loni Kalbhor News ) विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशभक्तीपर गीत गायन, नृत्य, भाषणे या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील इयत्ता आठवी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमात पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध प्रकारचे गीत गायन केले. (Loni Kalbhor News ) प्रतीक खेडकर या आठवीच्या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. तर इयत्ता सहावी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी ‘सुनो गौर से दुनियावालो’ या गीतावर नृत्य सादर केले.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून ‘पंचप्राण शपथ’ घेण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा पाटील यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बोरकर यांनी केले.
देशसेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता
प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले की, ‘ज्यांनी निःस्वार्थपणे देशाची सेवा केली व ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. (Loni Kalbhor News ) या अभियानात देशाचा स्वाभिमान जपण्याबरोबरच नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धिंगत व्हावी. यासाठी पंचप्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जात आहे. यामुळे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांचे कार्य स्मरणात राहील’.
अनेक वीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्य
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आपण साजरे करत आहोत. आपल्या देशाला अनेक वीरांनी बलिदान करून स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यांचे स्मरण व देशाविषयी अभिमान असला पाहिजे. (Loni Kalbhor News ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणून राज्य सरकार ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम साजरा करत आहे, असेही प्राचार्य गवळी यांनी सांगितले.