हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन व एमआयटी चौकात दररोज सकाळी साडे आठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र वाहतूक शाखेचे पोलीस सावलीला अथवा एखाद्या हॉटेलमध्ये गेम खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. (Loni Kalbhor News : Loni Station Chowk in the midst of problems, traffic jams are common; The traffic police stationed for traffic regulation disappeared in the morning and evening..)
तत्कालीन पुणे पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पोलीस बंदोबस्तासाठी लोणी स्टेशन व एमआयटी चौकात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार कर्मचारी उपलब्ध असतील अशी ग्वाही दिली होती. (Loni Kalbhor News) त्यानुसार बंदोबस्तासाठी पोलीस कार्मचारी हजर होते. मात्र वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची बदली झाल्याने सदर ठिकाणी पोलीसही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे वर्षानुवर्ष काणाडोळा
रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे वर्षानुवर्ष काणाडोळा केला जात आहे. (Loni Kalbhor News) त्यामुळे प्रशासनाच्या या मस्त कारभारामुळे स्टेशन परिसरात राहणारे नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत.
बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी हजर नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. (Loni Kalbhor News) बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस जातात कोठे? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. वाहतूक कोंडीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा वाहतूक पोलीस दुसऱ्याच गोष्टीला जास्त प्राधान्य तर देत नाहीत ना? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोणी स्टेशन चौकातील हॉटेलच्या शेजारी रिक्षा, जड वाहने, चारचाकी वाहने कायम पुणे – सोलापूर महामार्गावर उभे असतात. त्याच्या शेजारी वाहतूक पोलीस उभे असतात मात्र, पोलिसांच्या तोंडातून “ब्र” ही निघत नाही. (Loni Kalbhor News) त्यामुळे महामार्गावर उभे राहणाऱ्या वाहनचालकांचे व पोलिसांचे साटेलोटे आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. विशेष म्हणजे चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारीही दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.
दरम्यान, वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी लोणी काळभोर शहर वाहतूक शाखाच मुळात उदासीन असल्याचे चित्र आहे. (Loni Kalbhor News) याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील लोणी स्टेशन चौक, एमआयटी चौक, येथे उभा केलेले सिग्नल ही वाहतूक शाखेच्या ‘कृपे’ने मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.
लोणी स्टेशन चौकात पोलीस असले तरीही वाहतूक कोंडी कायमचीच..
लोणी स्टेशन चौकात महार्गाच्या एका लेनवर चारचाकी गाड्या लावून काही वाहनचालक तासनतास हॉटेलमध्ये बसत आहेत. त्यांना या वाहतूक कोंडीशी काहिहि घेणे देणे नाही. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. Loni Kalbhor News) त्यामुळे पायी चालणेही जिवावर बेतू शकते. मात्र स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलिस व लोकप्रतिनिधी कारवाई करत नाही.
चौकात पोलीस असले तरीही आजपर्यंत कोणत्याही वाहतूक शाखेच्या पोलिसाने या वाहनांवर कारवाई केली नाही.
कोंडीची मुख्य कारणे..!
– चौकात पीएमपीएल बस थांबा असल्याने पीएमपीएल बसेसना थांबण्यांसाठी मोठी जागा लागते.
– त्याचबरोबर चौकातून होणारी रिक्षा वाहतूकही मोठ्या प्रमाणांवर असून रिक्षाचालकांची निश्चित जागा नाही.
– निश्चित जागा नसल्याने रिक्षा कोणत्याही ठिकाणी थांबतात. तसेच, अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो.