विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरातील धुमाळ मळ्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Loni Kalbhor Police handcuffed house burglars in Kunjirwadi; 4 lakh worth of goods seized and 5 crimes solved)
लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
जलसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ३०, रा. सर्वे नं ११०, अंध शाळेच्या पाठीमागे, रामटेकडी हडपसर पुणे) आणि हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय ३२, रा. रामटेकडी बस स्टॉपशेजारी, कोठारी मारूती कार शोरूम जवळ रामटेकडी, हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (Loni Kalbhor News) याप्रकरणी मंदार सुभाष धुमाळ (रा धुमाळमला, श्रीनाथ भरकोबा मंदिराच्या मागे, थेऊरफाटा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंदार सुभाष धुमाळ हे कुंजीरवाडी येथे राहतात. (Loni Kalbhor News) धुमाळ यांचे कुटुंब लग्नासाठी १६ मे ला घरबंद करून गेले होते. तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथकाने घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करून आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुनिल नागलोत व दिपक सोनवणे यांना एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि, कुंजीरवाडी येथी घरफोडी करणारे (Loni Kalbhor News) चोरटे पुणे सोलापूर रोडवर कवडीपाट टोलनाका येथे तोंडाला रूमाल बांधून पल्सर दुचाकीवरून फिरत आहेत. तसेच गाडीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाचे पाठीवर काळ्या रंगाची बॅग आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोन्ही चोरट्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अंगझडती घेतली असता दोन्ही आरोपीपिंच्या कमरेला लावलेले दोन लोखंडी चाकु मिळून आले. (Loni Kalbhor News) तसेच त्यातील एका आरोपीच्या पाठीवरील काळया बॅगमध्ये २ लोखंडी कटावणी, एक लोखंडी चिमटा, आरोपींच्या ताब्यातील काळे रंगाची पल्सर दुचाकी गाड़ी असा तब्बल ३ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी जलसिंग दुधानी व हुकुमसिंग कल्याणी यांनी सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता सदची गाडी शिवाजीनगर परिसरामधून चोरी केली आहे. (Loni Kalbhor News) तसेच लोणी काळभोर येथील ४ व शिवाजीनगर येथील एका अशा ५ गुन्ह्यांची पोलिसांना कबुली दिली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय चव्हाण पोलीस निरिक्षक (गुन्हे) सुभाष काळे व पोलीस उपनिरिक्षक अमित गोरे, सतीश सायकर, सुदर्शन बोरावके, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, दिपक सोनवणे, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, चक्रधर शिरगिरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे महेश नवमीच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!