लोणी काळभोर (पुणे) : दौंड तालुक्यातील डाळिंब गावच्या कुंडलिक गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख एकावन्न हजार रुपयांचा निधी तर नगर जिल्ह्यातील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा” या शाळेसाठी एक लाख एक हजार रुपयांचा निधी दिला आहे. मुलीच्या लग्नातील अतिरिक्त खर्च टाळुन अडीच लाख रुपयांचा निधी देऊन गायकवाड कुटुंबियांनी केवळ दौंड तालुक्यासाठीच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्यासाठी मोठा आदर्श घालुन दिला आहे. (Loni Kalbhor News)
डामडौल व अतिरिक्त खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपयांची मदत
कुंडलिक गायकवाड यांचे जेष्ठ चिरंजीव वाल्मिक गायकवाड यांची कन्या, अंकिता हिच्या विवाह सोहळ्यासाठी हजर असणाऱ्या प्रत्येकाचे एकीकडे आदरातिथ्य करतानाच, दुसरीकडे गायकवाड कुटुंबियांनी विवाहसोहळ्यातील डामडौल व अतिरिक्त खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपयांची मदत करुन आपण समाजाचे देणे लागत असल्याचे दाखवुन दिले आहे. (Loni Kalbhor News)
डाळिंब गावचे कुंडलिक गायकवाड यांची नात अंकिता हिचा विवाह वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील लक्ष्मण श्रीपती गावडे यांचे चिरंजीव अजित गावडे यांच्याबरोबर नुकताच कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स या मंगल कार्यालयात पार पडला. या विवाहप्रसंगी एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड व त्यांचे बंधू वाल्मिक गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवला. तर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेसाठी” एक लाख एक हजार रुपयांच्या निधीचा धनादेश दिला आहे. (Loni Kalbhor News)
दौंड तालुक्यासह पूर्व हवेली परिसरात एक चांगला आदर्श
दरम्यान, घरातील लग्न सोहळा ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. पुणे जिल्ह्यातील लग्नांचा डामडौल काही वेगळाच असतो. मोठे लग्न व्हावे तसेच मोठ्या लोकांनी आपल्या लग्नाला यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र गायकवाड व गावडे परिवाराने लग्नातील वायफट खर्चाला फाटा देत, मुख्यमंत्री सहायता निधीला दिड लाख रुपयांची मदत करतानाच, शाळेसाठीही एक लाख रुपयांची मदत करुन दौंड तालुक्यासह पूर्व हवेली परिसरात एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल उपस्थित नागरिकांनी कौतुक केले आहे.
गायकवाड व गावडे या विवाह समारंभात नवदांपत्याला आर्शिवाद देण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते. यावेळी मंगेश चिवटे यांच्या समवेत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण काळभोर, भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व पुणे प्राईम न्यूजचे संपादक जनार्दन दांडगे, मांजरीचे माजी सरपंच व भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराज घुले, थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे, एसजीए ग्रुपचे संचालक रविजी गिरी, दिपक गाढवे, गोवर्धन पॉलिमर कंपनीचे मालक लक्ष्मण दांडगे आदी उपस्थित होते. (Loni Kalbhor News)
यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले, “एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड, त्यांचे बंधु वाल्मिक गायकवाड यांनी स्वतः संपर्क साधुन, मुख्यमंत्री सहायता निधीला दिड लाख रुपयांची देणगी देण्याची इच्छा व्यक्त केल्याने, शंकर गायकवाड, त्यांचे बंधु वाल्मिक गायकवाड कौतुकास पात्र आहेत. हा निधी स्विकारण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने मी स्वतः आलो आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतुन राज्यभऱातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी निधी दिला जात आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात सत्तर कोटींहुन अधिक रकमेची मदत विविध रुग्णांना दिलेली आहे. यापुढील काळातही राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.”