हनुमंत चिकणे : लोणी काळभोर
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : गाडीवरून कट मारल्याच्या कारणावरून पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात हाणामारी करणाऱ्या एका महिलेसह सहा जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (ता. १६) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Loni Kalbhor News)
अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
विपुल राजेश जाधव, (वय-२१, रा. साधणा बँकेजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) वैभव संजय वायकर, (वय-२२, रा. निर्सग सृष्टी सोसायटी, प्लॅट नं. डी ३, शेवाळवाडी, ता. हवेली) शंभुराज लक्ष्मण काळभोर (वय-२० रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) ओंकार राजेंद्र काळभोर (वय २७, रा. तरवडी रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) नितीन चंद्रकांत काळभोर (वय ३६ वर्षे, रा. तरवडी रानमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली) संगिता संजय वायकर (वय ४०, रा. निर्सग सृष्टी सोसायटी, प्लॅट नं. डी ३. शेवाळवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Loni Kalbhor News)
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेश चांगदेव कुदळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकाळभोर पोलिसांनी सार्वजनीक ठिकाणी मारामारी करुन सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Loni Kalbhor News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश कुदळे हे मागील दोन वर्षापासुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून सध्या तपास पथकात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली कि, लोणी स्टेशन परिसरात दोन गटामध्ये मोठमोठ्याने शिवीगाळ करून एकमेकांसोबत मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली होती. (Loni Kalbhor News)
सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक नागलोत, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे, भगत सदर ठिकाणी पोहोचले असता काही मुले मारहाण करीत असल्याचे दिसून आले. तसेच एक दुचाकी एक चारचाकी गाडी व इतर वाहने आडवे तिडवे लावलेली दिसली. तात्काळ पोलिसांनी पथकाच्या सहायाने भांडणे सोडवून वरील सहा जणांना ताब्यात घेतले. (Loni Kalbhor News)
दरम्यान, त्यांचायाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, गाडीवरून कट मारल्याच्या कारणावरून हि भांडणे झाली आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सार्वजनीक ठिकाणी मारामारी करुन सार्वजनीक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)
मागील पंधरा दिवसात पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन परिसरात हाणामारीत वाढ..
लोणी स्टेशन परिसरात मागील पंधरा दिवसात हनुमान मंदिर, लोणी स्टेशन चौकात भांडणाचे प्रकार वाढले आहेत. शुक्रवारी (ता. १६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी चालकाला गाडी नीट चालव म्हणल्याच्या कारणावरून दुचाकी चालकाने हटकलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली आहे. तसेच हनुमान मंदिर परिसरात मागील पंधरा दिवसात दोन गटात एका पोलीसासामोरच हाणामारी झाली होती. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. (Loni Kalbhor News)