जनार्दन दांडगे
Loni Kalbhor News : पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी‘स्कॉटलंड यार्ड’पोलिसांच्या पावलांवर पाऊल ठेवत, मागील अकरा वर्षाच्या काळात लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ गुन्हा दाखल असणाऱ्यापासुन ते थेट मोठ्या विविध गुन्ह्यात अटक, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारी प्रकारात मोडणाऱ्या तब्बल साडेतेरा हजाराहुन अधिक छोट्या-मोठ्या आरोपींची “डिजिटल कुंडली” च तयार केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी मागील अकरा वर्षाच्या काळातील गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा इतिहास “डिजिटल कुंडली”च्या माध्यमातून, तोही अत्याधूनिक डिजिटल पद्धतीने लिहुन काढला आहे. (“Digital Kundli” of more than 13,500 small and big criminals made by Loni Kalbhor Police, as soon as the case is registered, the police will understand “your worth and your worth”…, as soon as the case is registered, the police will understand)
जटिल गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तयार झालेल्या आरोपींच्या “डिजिटल कुंडली” मुळे यापुढील काळात लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीमधील घडणारे जटिल गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. (Loni Kalbhor News) तर दुसरीकडे लोणी काळभोर पोलिसांनी “डिजिटल कुंडली” तयार करण्यासाठी जमा केलेली माहिती पुणे शहर व ग्रामीण पोलिसांनाही भविष्यात प्रचंड उपयोगी पडणार आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाणे दिड वर्षापुर्वी शहर पोलिस आयुकत्तालयात दाखल झालेले आहे. यापुर्वींचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची आठ महिण्यापुर्वी बदली होताच, त्यांच्या जागी दत्तात्रेय चव्हाण यांनी पोलिस निरीक्षकपदाचा पदभार स्विकारला होता. (Loni Kalbhor News) वरीष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारताच, चव्हाण यांनी प्रथम लोणी काळभोर पोलिस हद्दीतील एकुणएक गुन्ह्यांची व गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. यातूनच “मिशन इंपॉसिबल”, “जेम्स बाँड” यांसारख्या हॉलिवुड गुन्हेशोधक चित्रपटांमध्ये एखादा मोठा गुन्हा घडल्यावर पोलिस दलाची आधुनिक यंत्रणा जशी सज्ज होते, त्याच धर्तीवर “डिजिटल कुंडली”च्या माध्यमातुन आधुनिक यंत्रसामग्री सज्ज झाली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील अकरा वर्षात घडलेले छोटे-मोठे गुन्हे, त्यातील गुन्हेगार, शिक्षापात्र आरोपी यांच्यासह गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या हाता-पायाचे ठसे, अंगावरील व्रण, डोळ्यांची बुबुळे, चेहऱ्याची बनावट याची डिजिटल माहिती संकलित करून, त्याचे जतन आणि संवर्धन करत आपला स्वतःचा नवा डेटा-बेस तयार केला आहे. (Loni Kalbhor News) भविष्यात घडणारे गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी या डेटाबेसचा मोलाचा सहभाग राहणार असून, अगदी एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होणार आहे.
दत्तात्रेय चव्हाण पुढे म्हणाले, “डिजिटल कुंडली” च्या माध्यमातुन गुन्हेगारामध्ये उदयास येणार्या डॉन, भाई, दादांची संपुर्ण कुंडलीच पोलिसांकडे तयार झालेली आहे. यामुळे यापुढील काळात गुन्हा दाखल झाल्याबरोबर, संबधिताची माहिती “डिजिटल कुंडली”च्या माध्यमातून तपासली जाणार आहे. त्यानुसार संबधित गुन्हेगारांवर कारवाई (Action against criminals)करण्यास मदत होणार आहे. “डिजिटल कुंडली” च्या माध्यमातुन या यापुढील काळात पोलिसांना समाजात शांतता (Peace in society) व सुव्यवस्था (Order) राखण्यासाठी रेकॉर्डवरील (record) जबरी चोरी, खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्हे (serious crimes) दाखल असलेल्या गुन्हेगारांवर (criminals) पोलिसांची (police) करडी नजर ठेवता येणार आहे.
“डिजिटल कुंडली” साठी ‘अँबिस’ प्रणालीचा वापर..
लोणी काळभोर पोलिसांनी “डिजिटल कुंडली” तयार करण्यासाठी ‘अँबिस’अर्थात ‘ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केलेला आहे. (Loni Kalbhor News) अँबिस संगणकीय प्रणालीत अटक आरोपींच्या बोटांची ठसे पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, फोटो, डोळ्यांचे बुबुळे, चेहऱ्याची बनावट, शरीरावरील व्रण, खुणा आदी सर्व डिजिटल स्वरूपात संकलित करून त्याचे जतन केले आहे. कुठलाही गंभीर गुन्हा घडल्यावर घटनास्थळावरून प्राप्त पुरावे, ठसे आदींचे संकलन करून या यंत्रणेद्वारे ते एका क्लिकद्वारे मॅचिंग करता येणार आहेत.
“डिजिटल कुंडली” मुळे अवैध धंदेवाले येणार रेकॉर्डवर…
“डिजिटल कुंडली”मुळे यापुढील काळात सर्वच प्रकारचे अवैध धंदे चालवणारे रेकॉर्डवर येणार आहेत. आत्तापर्यंत अवैध धंदे चालवणारे किंवा गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करतांना संबंधित विभागांकडून दंड ठोठावून सोडले जात होते. (Loni Kalbhor News) मात्र यापुढील काळात या “डिजिटल कुंडली” मुळे अवैध धंदे चालवणारे दंडात्मक कारवाई पेक्षा ते रेकॉर्डवर येतील व त्यांच्यावर तडीपारी अथवा मोक्का सारख्या कारवाया करणे सोपे जाणार आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये खाकीचा दरारा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचेही दत्तात्रेय चव्हाण यांनी स्पष्ठ केले आहे.
गुन्हेगारांच्या आश्रयदात्यांची माहिती संकलीत..
दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मागील अकरा वर्षाच्या काळात दोन अथवा दोनपेक्षा आधिक गुन्हे दाखल असलेल्या सर्वच गुन्हेगारांची, गुंडाची आधारकार्डासह माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, आजूबाजूचे वातावरण, स्थावर व जंगम मालमत्ता, त्याचे मित्र तसेच महत्वाची बाब म्हणजे गुन्हेगांरांच्या आश्रयदात्यांची माहिती गोळा केली गेली आहे. (Loni Kalbhor News) ही माहिती पोलिसांनी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यात गुन्हेगाराचे नाव समजल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे त्याच्यावर व त्याच्या आश्रयदात्यांवर तात्काळ कारवाई करणे पोलिसांना सोपे जाणार आहे.