Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नागरिकाला दुचाकीसह ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (At Loni Station Chowk, the dumper took the bike rider up to 30 meters)
दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला..
इम्रान हनिफ अन्सारी वय- ३८, (रा. यवत ता. दौंड) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून अन्सारी यांचे प्राण वाचले. हेल्मेट व त्यांनी दाखवलेली तत्परता यामुळे अन्सारी यांचे प्राण वाचले आहेत. (Loni Kalbhor News) अन्सारी यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान अन्सारी हे यवत या ठिकाणी राहण्यासाठी आहेत. त्यांच्या बहिणीचे उद्या शनिवारी (ता. २७) लग्न आहे. या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी कदमवाकवस्ती येथील नातेवाईक व पाहुणे मंडळीकडे दुचाकीवरून आले होते. (Loni Kalbhor News)
पाहुण्यांची भेट घेऊन लोणी स्टेशन चौकातून पालखी तळाकडे निघाले होते. यावेळी सोलापूरच्या दिशेने तरडे (त. हवेली) येथील एक मुरूम भरलेला डंपर निघाला होता. (Loni Kalbhor News) या डंपरचालकाने अन्सारी यांना पाठीमागून जोरात धडक दिली. तसेच दुचाकीसह त्यांना ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या हाताला, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकातील नागरिकांच्या मदतीने तत्काळ अन्सारी यांना विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Loni Kalbhor News) तसेच सदर डंपर चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावरून विना लायसन डंपर चालक सुसाट..
सिमेंट मिक्सर आणि बांधकाम साहित्याच्या डंपरचे वाहन क्रमांक दिसत नाहीत तर मागील ब्रेक लाईट ही बंद असतात. कारवाईकडे कानाडोळा झाल्याने नियम गुंडाळुन ठेवणाऱ्या अशा शेकडो डंपर चालकांवर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा वचक नसल्याचे चित्र आहे. (Loni Kalbhor News) अपघात झालेल्या डंपर चालकाकडे कोणताही वाहन परवाना नसताना सुसाट वाहतूक सुरु आहे. याच्यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी नेहमीप्रमाणे गायब…!
लोणी स्टेशन चौकात अपघात झाला तेव्हा या ठिकाणी कोणतेही वाहतूक पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते. नागरिकांनी दोन्ही बाजूने झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.(Loni Kalbhor News) त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांची मदत मिळण्याआगोदारच स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे. यामुळे वाहतूक पोलीस नक्की कुठे असतात ? अपघाताग्रस्त नागरिकांना मदतीसाठी कधीच उपलब्ध नसतात, अशी चर्चा नागरीकांमध्ये चांगली रंगली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या