Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी गस्त घालून रेकॉर्डवरील एकूण २९ आरोपींची झाडाझडती घेतली. सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत असताना दूचाकीस्वाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर वाहतूक पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली आहे.
रेकॉर्डवरील २९ आरोपींची झाडाझडती!
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. ८) गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने पायी पेट्रोलिंग मोहीम राबविली होती. पथकासह पायी गस्त घालीत असताना हद्दीतील कवडीपाट, (Loni Kalbhor News) लोणी स्टेशन, पठारे वस्ती, इराणी वस्ती, इंदिरानगर, लोणीगाव, गुजर वस्ती, समतानगर, कदम वाकवस्ती या परिसरात राहणाऱ्या आरोपींची थांबण्याची व नेहमी बसण्याची ठिकाणे तपासण्यात आली.
परिसरात पायी पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील आरोपी, तडीपार आरोपी, पाहिजे आरोपींना त्यांच्या राहत्या घरी जावून तपासणी केली. तसेच चांगल्या वर्तवणुकीबद्दल विधी संघर्षीत बालकांचे समुपदेशन करण्यात आले.
पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील एकूण २९ आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच लोणी काळभोर टोल नाक्याजवळ(Loni Kalbhor News) एका दुचाकीस्वारावर सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करीत असताना ताब्यात घेऊन, त्याच्यावर वाहतूक पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील केली. पोलिसांनी केलेल्या पायी पेट्रोलिंग व कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल म्हणाले, “यापुढे कोणीही व्यक्तीने कोणताही कायदा हातात घेऊ नये.(Loni Kalbhor News) नागरिकांना आवाहन आहे की, कोणीही व्यक्ती जर कोणताही गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य करत असेल तर बेधडक पोलिसांना कळवा. तुमचे नाव गुपित ठेवले जाईल. यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पोलीस आता योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करणार आहोत. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.