विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतीत गेल्या पंधरा दिवसापूर्वी कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या झेंडे यांच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग्ज बदलताना एक तरुण चिकटल्याची घटना ताजी असतानाच आता, पुन्हा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर जवळील अनधिकृत होल्डिंग बदलताना ३० वर्षीय तरुण विद्युत प्रवाहाला चिकटल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (ता.५) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (A 30-year-old man got electrocuted while changing flex on unauthorized hoardings near MIT corner in Loni Kalbhor area.)
बाळासाहेब बबन भंडलकर (वय-३०, रा. शेवाळेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. भंडलकरला लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Loni Kalbhor News) यामध्ये तो गंभीर भाजला असल्याची माहिती मिळत आहे.
१५ दिवसात घडलेल्या दोन घटनांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मागील १५ दिवसात कदमवाकवस्ती परिसरात होर्डिंग्ज बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना घडल्यानंतर प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्जवर कोणतीही कारवाई केली नाही. (Loni Kalbhor News) अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोणी काळभोर परिसरात अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई कधी – नागरिकांचा सवाल…?
पुणे-सोलापूर महामर्गावर हडपसर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन यादरम्यान शेकडो अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होल्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. (Loni Kalbhor News) या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई का केली जात नाही असा सवाल सामान्य नागरिक करू लागले आहेत.
महावितरणाला जाग कधी येणार…
पूर्व हवेली विद्युत प्रवाहांच्या जवळ मोठ्या प्रमाणत अनधिकृत होल्डिंग तयार केलेल्या आहेत. या होल्डिंग मालकांकडे महावितरण कारवाईचा बगडा का उगारीत नाहीत. (Loni Kalbhor News) महावितरण दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तरच महावितरणाला जाग येईल का? या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जातात…
एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकाचौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायकरित्या जाहिरातीचे पोल उभारले जात आहेत. (Loni Kalbhor News) काही ठिकाणी तर पथदिव्यांच्या खांबांवर हीटलेस बांधले आहेत. परंतु, याकडे कारवाईच्या नावाखाली प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवणे जात आहेत.