Loni Kalbhor : लोणी काळभोर : ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’, ‘नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः’ या मंत्रघोषात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माईर्स विश्वराज हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (ता. १९) नवचंडी याग विधिवत पार पडला.
डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते नवचंडी याग
नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिपदा ते नवमीदरम्यान देवीच्या मंदिरात घटस्थापना, रुद्राभिषेक, महिला मंडळाचे भजन, कीर्तन, प्रवचन, भावगीत व भक्तिगीतांचे कार्यक्रम, ललिता पूजन, कुमारिका पूजन, नवचंडी याग आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. (Loni Kalbhor) त्याच अनुषंगाने हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते नवचंडी याग झाला. या वेळी डॉ. दर्शन गौड, डॉ. संजय धनगर, हर्षा पालवे, डॉ. संतोष पवार, सुधीरचंद्र उत्तम, संदीप, सुरेश मुंडे व हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवीचे पूजन करताना विशेष महत्त्व असते, ते कुमारिका पूजनाला. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. चैत्र आणि शारदीय नवरात्रात देवीचे विशेष कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष व्रताचे आयोजन केले जाते. (Loni Kalbhor) यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व आहे. कुमारिकांना देवीचे प्रतीक मानून त्यांचे पूजन, मान-पान केला जातो. कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभाशिर्वाद देते, असे मानले जाते. कुमारिका पूजन हे दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केला जाते.
या वेळी डॉ. अदिती कराड यांनी कुमारिका पूजन केले. या वेळी १२ मुलींची ओटी स्वत: डॉ. अदिती कराड यांनी भरली. उपस्थितांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.