Loni Kalbhor: लोणी काळभोर (पुणे): दरोडेखोरांना अथवा चोरट्यांना मोठ्या शिताफिने व जिवावर उदार होऊन पकडणाऱ्या पोलिसानींच स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच पोलिस ठाण्यात दरोडा होय, शब्दश: दरोडाच टाकल्याचा धक्कादायक प्रकार शहर पोलिस दलाअंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आता याप्रकरणी 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सोमवारी या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी काढली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू (झिरो पोलीस) या आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस करणाऱ्याने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.