Loni Kalbhor Crime, लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे. (Loni Kalbhor Crime)
योगेश शांताराम लोंढे (वय 30 रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
दरम्यान, आरोपी लोंढे हा नायगाव फाटा, कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, पुणे-सोलापूर रोड परिसरात दहशत निर्माण करुन नागरिकांना त्रास देत असायचा. अखेर पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार, पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश लोंढे हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, आरोपी त्याच्या साथीदारांच्या मदतीने सतत गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी योगेश लोंढे याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन परिमंडळ पाचचे पोलीस पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठवला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.