Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे जलशुद्धीकरण केंद्र (R.0.) देण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थी संख्या लक्षात घेवून मोठ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र मंजुर…
पृथ्वीराज कपूर मेमोरियल विद्यालयाने हिंदुस्थान पेट्रोलियम लि. कंपनीला जलशुद्धीकरण केंद्रांची मागणी केली होती. त्यानुसार कंपनीने शालेय विद्यार्थी मोठी संख्या लक्षात घेवून मोठ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र मंजुर केले. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल यामध्ये त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी उपमहाप्रबंधक रमेश यादव, प्रबंधक सुशिल कुमार, प्रबंधक विकी पिसे, मनोज पाटील, बापू बोरकर कॉन्ट्रॅक्टर विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षिका बोरकर एस.एस, पर्यवेक्षक शिंदे एस. जे. यांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान, रमेश यादव यांनी पाण्याचे महत्व, पुर्नवापर, नियोजन व देखभाल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ‘विकी पिसे यांनी मराठी माध्यमाचे महत्व, गुणवत्तावाढ व स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षिका बोरकर एस. एस यांनी पाण्याचे महत्व त्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. जलशुद्धीकरण यंत्र मंजूर करून व त्याचे काम पूर्ण होण्यासाठी साठे आर. एम यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साठे आर. एम यांनी केले सुत्रसंचालन जानवर डी.ए. यांनी केले. व आभार प्रदर्शन बोरकर एस.एस मॅडम “यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!