Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : एंजल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर येथील विद्यालयचा एस.एस.सी. बोर्डाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने अखंड २५ वर्षे निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. (Angel High School and Junior College Students S. S. C. Great success in the exam)
२५ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम..
एंजल विद्यालयामधून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या(Loni Kalbhor) विद्यार्थ्यांमध्ये प्रथम प्रांजली रतन झेंडे ९७.०० टक्के, द्वितीय आदिती सचिन राठी ९६.८० टक्के, तृतीय सृष्टी महादु जठार ९६.६० टक्के, संस्कृती दत्तात्रय राऊत ९६.४० टक्के, मानस सुनिल चांदणे ९४.४० टक्के, गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातून एकूण १४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य ८३ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ४७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १८ विद्यार्थी आहेत. (Loni Kalbhor) शाळेचे प्रेरणास्त्रोत पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री सर, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री सर, शाळा व्यवस्थापक इराणी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद कोतवाल, खुशबु सिंग व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : मांजरी खुर्द येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
Loni Kalbhor : थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के
Loni Kalbhor : थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के