Loni Kalbhor : लोणी काळभोर : चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल, तो जग जिंकेल असे म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. प्रभावी वक्ता होण्यासाठी वाचन, स्मरणशक्ती, निरीक्षण, भाषेवर प्रभुत्व, शब्द सऺचय, आत्मविश्वास, सभाधीटपणा, विचार, आवाज, वक्तृत्व कौशल्य हे मूळ आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याचे विचार, आवाज आणि वक्तृत्व कौशल्यावरून ओळखले जाते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांनी केले.
हवेली तालुका प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाची बैठक लोणी काळभोर येथे संपन्न
हवेली तालुका संघाची मासिक बैठक लोणी काळभोर येथे नुकतीच पार पडली. या वेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सचिन मोरे बोलत होते. (Loni Kalbhor ) या वेळी प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळभोर, जेष्ठ पत्रकार प्रभाकर क्षीरसागर, तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की, कोणतीही गोष्ट हृदयापासून करा, डोक्यात ठेवू नका. काळानुरुप स्वतःमध्ये बदल करा. कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे. (Loni Kalbhor ) धावत्या युगात दैनंदिन आहार, विहार, आचार, विचार, कृती, अध्यात्म, व्यायाम, हास्य, आपुलकी, मित्र, प्रेम, ध्यान, श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा (उत्तर) सोशल मीडियाच्या संयोजकपदी निवड झाल्याबद्दल जनार्दन दांडगे, रॉयल मीडिया न्यूज या साप्ताहिकाचा शुभारंभ केल्याबद्दल तुकाराम गोडसे व वक्तृत्व या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
या वेळी पत्रकार अमोल भोसले, जितेंद्र आव्हाळे, भाऊसाहेब महाडिक, हनुमंत चिकणे, गोरख कामठे, सुधीर कांबळे, विशाल कदम, गौरव कवडे, गोरख कामठे, राजेश धिवार आदी उपस्थित होते. (Loni Kalbhor ) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अमोल आडागळे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : श्रीमद् भागवत गितेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : प्रा.डॉ.मंगेश कराड