Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र गुलाब काकडे व राणू बबन कुंजीर यांचे दांपत्य अमोल व चि. सौ. का. साक्षी यांच्या लग्नाला होणारा अवास्तव खर्च टाळून राज्यातील गोरगरीब रुग्णांना मदत करणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाला २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पूर्व हवेलीसह परिसरात आजपर्यंत थेऊर या परिसरात चांगला आदर्श निर्माण केला जात असून याचे संपूर्ण हवेलीसह जिल्ह्यात एक वेगळा पायंडा पाडला जात आहे.
अनावश्यक खर्च टाळून उपयोग समाजासाठी…
थेऊर येथील अमोल काकडे व साक्षी कुंजीर यांचा शुभविवाह सोमवारी (ता. २३) रोजी पार पडला. यावेळी त्यांनी आपणसुद्धा समाजाचे देणे लागत असल्याची जाणीव उभय वधू-वर पक्षाला झाल्याने विवाहातील अनावश्यक खर्च टाळून त्याचा उपयोग समाजासाठी व महाराष्ट्रात उद्भवत असलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देण्याची कल्पना मांडली गेली. त्यानुसार धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे संचालक पुरुषोत्तम वायाळ, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्र कंद, संचालक रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, नानासाहेब आबनावे, मिलिंद हरगुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, माऊली कटके, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, मनोज काळभोर, चित्तरंजन गायकवाड, सचिन तुपे, संदीप धुमाळ, नंदू काळभोर, शिवराज घुले, संतोष कांचन उपस्थित होते.
तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, उपनिरीक्षक विष्णू देशमुख, दिलीप वाल्हेकर, सनी उर्फ युगंधर काळभोर, माजी नगराध्यक्ष गजानन दानवले, बजरंग म्हस्के, तुकाराम पवार, तानाजी हरगुडे, गाडामालक सचिन काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, बाबासाहेब काकडे, काळूराम कांबळे, युवराज काकडे, सचिन काकडे, राजेंद्र काकडे, किसन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल