Loni Kalbhor : लोणी काळभोर : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळाल्याच्या घटना आपण वाचत, ऐकत असतो. नियमबाह्य वाहने चालविल्यामुळे महामार्गांवरील अपघातांच्या प्रमाणात दखील वाढ होत आहे. अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी कॉर्नर येथे सोमवारी (ता. २१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून एका महिलेची गाडी सुसाट सुटल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम पायदळ तुडवत भरधाव वेगाने गाडी हाकणाऱ्या या महिलेने आपल्या चिमुरड्याला देखील गाडीवर उलट दिशेने तोंड करून बसवले आहे. या प्रकारामुळे महिलेसह मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो, याचे भान राखणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लहान मुलगा हा लोणी काळभोर येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. मुलाची शाळा सुटल्यानंतर महिला मुलाला आणण्यासाठी शाळेत गेली होती. महिलेने मुलाला दुचाकीवर उलट दिशेने तोंड करून बसविले आणि एमआयटी चौक ते लोणी काळभोर या दरम्यान सेवा रस्त्याने दुचाकी भरधाव वेगाने हाकली. (Loni Kalbhor) त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरून रॉंग साईडने जॉयनेस्ट व कुशल वाटीला या सोसायट्यांच्या दिशेने त्या निघून गेल्या.
दरम्यान, सर्वच पालक आपल्या पाल्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत असतात. मात्र, लहान मुले चंचल व हट्टी असतात. (Loni Kalbhor) अनेकदा दुचाकीवर बसवल्यानंतर ते शांत बसत नाहीत. ते सतत एखादी कृती करीत असतात. या कृतीकडे पालकांचे दुर्लक्ष झाल्यास अनवधानाने मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. लोणी काळभोर येथील महिलेच्या निष्काळजीपणामुळे लहान मुलाचा जीव धोक्यात आल्याचे संबंधित व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीची गरज व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, उरुळी कांचन येथे हार्बर सोसायटी संस्थेकडून वाहतूक सुरक्षा जनजागृती