Lonavala News : पुणे : हवाई दल तळाच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यास मनाई आहे. असे असतानाही नियम डावलून लोणावळ्यातील हवाई दल परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला आहे.
ड्रोन कॅमेरा जप्त
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बालकृष्ण विरेशम मुन्था (वय २९), के. दिनेश के. आनंद (वय २९), तनिष तिलक तेजा श्रीनिवास राव (वय २५, तिघे रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघेजण मूळचे हैदराबाद येथील आहेत.
लोणावळ्यातील लायन्स पाॅईंट परिसरात हवाई दलाचा तळ असून, नौदलाची आयएनएस शिवाजी संस्था आहे. महत्त्वाच्या लष्करी संस्था असल्याने या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यास मनाई आहे. तशा आशयाचे फलक देखील हवाई दलाने परिसरात लावले आहेत. (Lonavala News) असे असतानाही नियम डावलून येथे ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू होते. हवाई दलातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणावळा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
याप्रकरणी आदेशाचा भंग करणे, बेकायदा चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. (Lonavala News) तिघांकडून ड्रोन जप्त करण्यात आला असून, त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : लोणावळ्यात फिरणाऱ्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा खाणीत बुडून मृत्यू..
Lonavala News : टाटा मोटर्स कंपनीतील कर्मचारी कुंडमळा धबधब्यात गेला वाहून