लोणी काळभोर, (पुणे) : शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व हवेलीसह पुणे, पिंपरी चिंचवड येथील अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून 49 अनधिकृत शाळांची यादीच बुधवारी (ता. 10) जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून शिक्षण विभागाने पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तुमच्या मुलांना अनधिकृत शाळेत प्रवेश पाठवू नका, असं आवाहन जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे.
पुण्यातील अनधिकृत शाळांमध्ये पुरंदर, खेड, दौंड, मुळशी, पिंपरी चिंचवड, आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. बोगस शाळांवर कारवाई करत जिल्हा परिषदेनं पावलं उचलली, काही शाळा बंदही झाल्या. पण काही मात्र अद्यापही सुरुच होत्या. त्यामुळे या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केले आहे.
दरम्यान, यंदा शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली नव्हती. ज्यावेळी हा विषयच चर्चेचा होऊ लागला त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.
या आहेत पूर्व हवेलीतील अनधिकृत शाळा
– द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे),
– रामदास सिटी स्कूल रामदरा (लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे),
– मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल (कदम वाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे),
– श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे),