– विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथील पंचक्रोशीत पडलेल्या रविवारी रात्रीच्या मुसळधार पावसात वाडेगाव गावठाण लोकवस्तीत असलेल्या जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याची दुर्घटना घडली. कळसावर वीज कोसळल्याने कळसाच्या बांधकामाला तडा जाऊन खड्डा पडला आहे. अशी माहिती युवा नेते तथा उद्योजक प्रवीण जयवंत गावडे यांनी दिली.
जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या जवळच लागून मोठी गावठाण लोकवस्ती व विविध प्रकारची दुकाने आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असताना जोरदार मेघ गर्जना होऊन लख्ख प्रकाश जोगेश्वरी मंदिर परिसर वाडेगाव लोकवस्तीत दिसला. त्यावेळी ही वीज जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या कळसावर पडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वीज पडून कळसाला तडे गेले असून मंदिरातील वीज वाहिनीच्या तारा जळाल्या आहेत, तर सर्व वीज बल फुटले आहेत. यावेळी वीज पडल्यानंतर मंदिराची पाहणी माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, सरपंच वैशाली केसवड, सामाजिक कार्यकर्ते संदिप केसवड, युवा नेते प्रवीण गावडे, लाला गावडे, मारुती गावडे, बापू गावडे, आदी ग्रामस्थांनी सकाळी वीज पडलेल्या जोगेश्वरी मंदिर परिसराची पाहणी केली.