शिरूर, (पुणे) : Shirur Crime ऊस तोडण्यासाठी (sugarcane worker) आलेल्या महिलेवर शेतामध्ये असलेल्या बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याची घटना संविदने (ता. शिरूर) Savindane ( Shirur)ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. १९) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला (Woman injured) जखम झाली आहे. याबाबत सागर रोकडे यांनी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना फोनवरून माहिती दिली. (Shirur Crime)
संविदने ग्रामपंचायत हद्दीतील लंघेमळा येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संविदने ग्रामपंचायत हद्दीतील लंघेमळा येथील पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये मागील ८ दिवसापासून बिबट्या व पिल्ले असल्याचे उसतोडणी करताना निदर्शनास आले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन फटाके वाजवा तो निघून जाईल अशा पद्धतीचा सल्ला दिला. रविवारी (ता. १९) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी आलेल्या महिलेवर शेतामध्ये असलेल्या बिबट्याने हल्ला केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने वन कर्मचारी हनुमंत कारकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावला आहे. सविंदणे येथे बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेकदा पशूधनांवर हल्ले झाले आहे. यामुळे वनविभागाच्या वतीने तात्काळ उपाययोजना राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना पंढरीनाथ धोंडीबा लंघे म्हणाले, “ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या व पिल्ले असल्याची माहिती ८ दिवसांपूर्वी वनविभागाला दिली होती. कारखाना बंद होण्यासाठी २ दिवसच बाकी आहे. बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणी मजूर घाबरले असून, ऊसतोडण्यास तयार नाही. कारखान्याने ऊस न नेल्यास राहिलेल्या ऊसाची नुकसान भरपाई वनविभागाला द्यावी लागेल.”