पुणे : पाळीव प्राणी असलेले घर वेगळेच भासते. त्या घरात आणि घरच्या माणसांच्या मनात या ‘सोबत्यां’ची एक खास जागा असते. घरातील सदस्याप्रमाणेच या सोबत्यांचे डोहाळेजेवण, वाढदिवस देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. तर काहीजण चक्क आपल्या आवडत्या प्राण्याने जन्म दिलेल्या पिल्लांचं बारसं देखील जल्लोषात साजरं करतात. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. एका व्यक्तीने आनंदाच्या भरात चक्क आपल्या लाडक्या कुत्रीच्या पिल्लांच्या बारशाचा सोहळा आयोजित केला. एवढेच नव्हे तर या प्रसंगाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गावकऱ्यांना जेवण अन् मिठाईचे वाटप केले… एवढेच नव्हे तर रात्री रंगारंग कार्यक्रमही ठेवला होता.
कुत्रीच्या पिल्लांच्या बारशाचा सोहळा आयोजित केला.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील सदर तहसील भागात असलेल्या उधनापूर येथे कुत्रीच्या पिल्लांच्या जन्माचा हा अनोखा सोहळा पार पडला. आपल्या घरात नवजात बालकाच्या बारशाचा सोहळा केला जातो, तसाच सोहळा कुत्रीच्या पिल्लांचा त्यांच्या जन्मानंतर करण्यात आला. ही कुत्री ज्या कुटुंबात राहते, त्या कुटुंबाला तिचा खूप लळा लागलाय. कुटुंबियांनी ती कुत्री प्रसूत झाल्यानंतर आनंद साजरा करताना तिच्या पिल्लांचेही जल्लोषात स्वागत केले. यावेळी कुटुंबियांनी तिच्या पिल्लांचे बारसेही केले आणि चिंकी, मिंकी व पिंकी अशी त्यांची नावेही ठेवली.(Pune News)
चिंकी, मिंकी व पिंकी यांच्या येण्याने कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही खूप आनंद झाला. मग सर्वांनी वाजत-गाजत अन् नाचत आनंद साजरा केला. गावात नवजात बालकाच्या बारशाचा सोहळा साजरा केला जातो, तसाच सोहळा कुत्रीच्या पिल्लांचा त्यांच्या जन्मानंतर करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांना भरपूर मिठाई आणि चमचमीत पदार्थांची मेजवानीही देण्यात आली. या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी होत भोजनाचा आस्वाद घेतला. एवढेच नव्हे तर रात्री रंगारंग कार्यक्रमही ठेवला होता. पिल्लांच्या जन्मानंतर १२ दिवसांनी संपूर्ण कुटुंबाने गावात १२ कार्यक्रमांचे आयोजन केले होते.(Pune News)
कार्यक्रमाचे आयोजक सुरेश यांनी सांगितले की, आमच्या घरात कुत्रीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. गावात जन्मलेल्या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम होतो, तसाच कार्यक्रम आम्ही या निमित्ताने आयोजित केला.(Pune News)
—————–