उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील जुन्या पिढीतील कौशल्या पंढरीनाथ चौधरी (वय- ९५) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता. ०९) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत नेते पंढरीनाथ बाबुराव चौधरी यांच्या त्या पत्नी, तर राष्ट्रवादीचे हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते व यशवंत कारखान्याचे माजी संचालक रामदास चौधरी यांच्या त्या मातोश्री होत.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.