बारामती : महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नियोजनात कोऱ्हाळे बुद्रुक येथील साठेनगर, समतानगर व पंधरा फाटा येथील डोंबारी वस्ती येथे कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष साधू बल्लाळ, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी तसेच कोऱ्हाळे गावचे सरपंच बापूराव खोमणे तसेच खंडागळे आदींनी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ यांनी मार्गदर्शन करताना ग्रामस्थांच्या सर्व समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन दिले. घड्याळ तेच, वेळ नवी असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांना घड्याळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कोपरा बैठकीस साठेनगर, समतानगर व पंधरा फाटा येथील डोंबारी वस्ती ग्रामस्थ, युवक व महिलांनी उदंड प्रतिसाद दिला व आमचे संपूर्ण गाव अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगून एकच वादा वहिनी आणि दादा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हाच वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देवून मुख्य प्रवाहात आणू शकतो. उपेक्षित घटकांवर अजित पवार यांचे विशेष लक्ष असून त्यांचे हात बळकट कारण्यासाठी व केंद्रातून भरीव निधी आणून बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुनेत्रा पवार यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे सुनिल बनसोडे यांनी व्यक्त केले. तर हेमंत गडकरी यांनी भावनिक आवाहनांना बळी न पडता विकासाची दिशा पाहावी. अडीअडचणींना धावून येणाऱ्या अजित पवार यांच्यामागे संपूर्ण वंचित समाजाने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी सोशल मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष साधू बल्लाळ, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष व कोऱ्हाळे गावचे सरपंच बापूराव खोमणे तसेच खंडागळे, राष्ट्रवादी व्ही.जे.एनटी. सेलचे संघटक अनिल शिंदे, सुरेश शिंदे, विकास शिंदे, कैलास शिंदे, रमेश शिंदे, रावसाहेब पवार नितीन पवार, किसन अडागळे तसेच ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.