उरुळी कांचन, (पुणे) : तुम्ही जर उरुळी कांचन परिसरात असाल आणि तुम्हालाही आपल्या फॅमिलीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत चविष्ट प्युअर व्हेज जेवणाचा आनंद लुटायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका हॉटेलची माहिती देणार आहोत. जी तुमच्या पोटाची आणि खाण्याच्या आनंदाची १०० टक्के खात्री देते. उरुळी कांचनमधील ‘हॉटेल सोनाई प्युअर व्हेज’ असं या आनंददायी जागेचे नाव आहे. चला, तर मग जाणून घेऊयात हॉटेल बद्दल सविस्तर .
उरुळी कांचन शहराला लागूनच सुरेशशेठ रानवडे आणि अशोकशेठ रानवडे यांनी १९९१ ला ४ टेबल पासून या हॉटेलची सुरुवात केली होती. तेव्हापासून येथील सोयी सुविधा, चोखंदळ खाऊप्रेमींसाठी खाद्यपदार्थांची विविधता, प्रशस्त आणि आकर्षक इमारत, सुसज्ज व्यवस्था यामुळे खवय्यांच्या पसंतीस हॉटेल सोनाई उतरलेले आहे. कार्पोरेट मिटिंग, सेमिनार, वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. उरुळी कांचनसह परिसरातील शहरातील प्रत्येक क्षेत्रातील ग्राहकांशी हॉटेल सोनाई प्युअर व्हेज य हॉटेलने येथील विविधता व सोयी-सुविधांनी नाते तयार केले आहे.
ग्राहकांच्या गरजेनुसार ५० ते ५०० लोकांपर्यंतची आसन व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर प्रशस्त पार्किंगची सुविधा, साऊंड प्रुफ भिंती, वैयक्तिक वातानुकूलित सेवा, मनोरंजन व माहितीसाठी जागोजागी स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रॉनिक सुरक्षा सुविधा, सर्वसोयीनियुक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेले बाथरूम आणि स्वच्छतागृह येथे उपलब्ध आहेत.
चव, दर्जा व खाद्य पदार्थातील विविधता येथे जपली आहे. शाकाहारी, स्वादिष्ट भोजन, इत्यादी विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक हॉटेल सोनाईला पसंती देतात. चव, दर्जा, उत्कृष्ट सेवा, सुविधा यामुळे उरुळी कांचन व शहरात ३४ वर्षांपासून हॉटेल सोनाईची चवदार परंपरा सुरु आहे.
नेमकी स्पेशालिटी काय?
या हॉटेलमध्ये तुम्हाला फेमस डिश – व्हेज अंडाकरी, व्हेज सुरमई, पनीर बादशहा, मशरूम नवाबी, व्हेज पिस्तावरी.
तसेच नाश्त्यासाठी साउथ इंडियन ही त्यांची स्पेशालिटी आहे. हे सर्व पदार्थ घरगुती पद्धतीच्या मसाल्यात बनविले जातात. त्याचबरोबर जिलेबी, गुलाबजामून नॅचरल रबडी व फळांचे ज्यूस दिले जातात. यामध्ये शाकाहारी मेजवानीची भली मोठी लिस्ट तुम्हाला चाखायाला मिळेल.
या हॉटेलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉटेलचे किचन हे सर्वात स्वच्छ आहे व या ठिकाणी काम करणारे अनुभवी कामगार आहेत. अनुभवी शेफ, वेटर्स व कॅप्टन आहेत. पुणे – सोलापूर महामार्गाशेजारी प्रशस्त पार्किंग, खास शाकाहारी लोकांची अचूक आवड ओळखून ‘ग्राहक हेच दैवत’ या हेतूने हॉटेलमध्ये सेवा सुरू आहे. तसेच या हॉटेलमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले गार्डन असून प्रशस्त लॉन आहे.
यांचा आहे सहभाग..
सुरेशशेठ रानवडे, मनोज अशोक रानवडे, ओमकार रानवडे आणि तुषार रानवडे यांनी हॉटेलचा व्यवसाय वाढवला आहे. त्यामुळे छोट्या वृक्षाचा वटवृक्ष झाला आहे.