Khadki Crime: पुणे: सासू आणि जावयाचा वाद झाला. या वादातून घरजावयाला सासून घर सोडून जाण्यास सांगितल्याने जावयाने सासूच्या तोंडावर गरण पाणी टाकले आणि मारहाण करत तिचे दोन दात पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 22 मे रोजी घडली आहे. (If you are going home, read this news! Mother-in-law knocked out two teeth while going home in Pune; A case has been registered at Khadki Police Station)
खडकीतील घटना…
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजाता कैलास शिंदे (50) असे मारहाण झालेल्या सासूचे नाव आहे. (Khadki Crime) याप्रकरणी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (25,आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार कॉलनी मुळा रोड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजाता शिंदे या खडकी येथील ऍम्युनेशन फॅक्टरीत नोकरीस आहेत. (Khadki Crime) आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून, त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार कॉलनीत राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला.
त्यावेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहण्यास जाण्यास सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने गरम पाणी सासूच्या तोंडावर टाकले. त्यानंतर केसाला धरून डोके खाली फरशीवर आपटून त्यांच्या तोंडातील दोन दात पाडले. (Khadki Crime) पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Khadki Crime : आता तर हद्दच झाली राव ! पुण्यात चप्पलाच केल्या लंपास ; खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Khadki crime : खुन्नसने काय बघतो म्हणत तरुणावर चाकूने वार
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना