उरुळी कांचन, (पुणे) : सक्षम समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ आयोजित दिव्यांग अधिवेशन बारामती विभाग २०२२-२३ चे आयोजन श्री बोरमलनाथ देवस्थान चौफुला येथे करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन सक्षमचे प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दर ३ वर्षांनी जिल्हा स्तरावर सर्व प्रकारचे दिव्यांग एकत्र यावेत त्यांना एकमेकांच्या अडचणी कळाव्यात तसेच ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थाची ही माहिती सर्वांना व्हावी यासाठी हे अधिवेशन आयोजित केले जाते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी कौस्तुभ कोठारी, अपंग वित्त विकास महामंडळ च्या अधिकारी सविता मोरे, बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे कैलास आबा, मिलिंद साळवी, बारामती जिल्हा कार्यवाहक पोपटराव शिंदे, सोनाली तांबे,
सक्षम पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भेगडे, उपाध्यक्ष निलेश जागडे, सचिव विजय पगडे, पुणे महानगर उपाध्यक्ष अशोकजी जव्हेरी, सहसचिव सुनील पाटील, अमोल मोटे, बारामती जिल्हा संयोजक नानासो उत्तम जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव महेश टंकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, दत्ता खेडेकर फुलचंद ढवळे,
विश्वास शितोळे, ऋषिकेश बोत्रे, तुषार शेळके, विठ्ठल कुदळे, अमित कांचन, पूजा सणस, इसाक आतार, राजू पांगारकर, उमेश म्हेत्रे, रवींद्र बारवकर, बालाजी मोरे, शिवराज बिराजदार, अमोल गवांदे आदी उपस्थित होते.
सक्षम ही संस्था विकलांग क्षेत्रात अखिल भारतीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. सक्षमचे काम संपूर्ण भारतात ४३ राज्यांमधे चालते. सक्षम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना बरोबर घेऊन दिव्यांगांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करते.
सक्षमची बारामती व पश्चिम महाराष्ट्रात दिव्यांगासाठी वधुवर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे, व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग, स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी उद्योजकता परिचय मेळावे व दिव्यांग सेवा केंद्र या सारखी विविध कामे चालू आहेत. ह्या सर्व गोष्टी मोफत केल्या जातात, ह्यासाठी संस्था कोणतेही शुल्क आकारात नाही.
दरम्यान, २०१९ साली प्रयाग येथे पार पडलेल्या कुंभ मेळ्यामध्ये सक्षमतर्फे नेत्र कुंभचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये ५ लाख जणांची नेत्र तपासणी करून २.५ लाख चष्म्यांचे मोफत वाटप केले गेले. ह्या उपक्रमाची एक जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली.
सक्षम तर्फे कंबा (कॉर्निया अंधत्व मुक्त भारत) हे अभियान संपूर्ण भारतात चालवले जाते. भारतातील काही राज्य सरकारे देखील ह्या मध्ये सहभागी आहेत. ह्या अभियान अंतर्गत दोन वर्षापूर्वी नेत्रदान संकल्प अभियान संपूर्ण भारतात राबविले गेले. त्या अंतर्गत ३ लाखाहून अधिक नेत्रदान संकल्प पत्र ऑनलाइन पद्धतीने भरून घेतली गेली हा हि एक जागतिक विक्रम ठरला आहे.