धनंजय साळवे
Kavthe Yemai : कवठे येमाई : माझ्या पप्पांनी गणपती आणला… या गाण्याची सगळीकडेच धूम आहे. गणपती बाप्पा मोरया… चा जयघोष परिसरात सुरू आहे. डोक्यावर बाप्पांची मूर्ती घेऊन निघालेल्या गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला येणारा गणेशोत्सव हिंदू बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. ग्रामीण भागात सुद्धा गणेशाच्या आगमनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे प्रत्येक कार्याची सुरुवात त्याच्या पूजनाने करण्याची प्रथा आहे. (Kavthe Yemai) गणेशाबद्दल बाल गोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात आदराची भावना आहे. त्यामुळे सर्वच जण त्याचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी आतूर आहेत.
यावर्षी सजावटीच्या साहित्यात महागाईमुळे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली असली, तरी खरेदीचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. निर्वीकल्प, निराकार, रूपम असे ज्याचे वर्णन पुराणात केले आहे, अशा गणेशाचे आज घरोघरी, मंजळांमध्ये थाटात स्वागत झाले. श्री गणेश दहा दिवस आपल्या घरात, आपल्या सोबत असतो, त्यामुळे हे दहा दिवस उत्सवाचे असतात.
कवठे येथील सार्वजनिक मंडळांनी सार्वजनिक हिताचे उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. महिला भगिनींसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असून, लहान मुलांसाठी स्पर्धा, सर्वच वयोगटांतील लोकांसाठी करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (Kavthe Yemai) कवठे गावात विना वर्गणी गणेशोत्सवाला काही मंडळाकडून प्राधान्य दिले आहे. यामध्ये नवज्योत मित्र मंडळ व फ्रेंडशिप मित्र मंडळ आघाडीवर आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार