Katraj | कात्रज : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याची धक्कादायकमाहिती समोर आली आहे. हा मोठा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
फोटो आणि व्हिडीओ व्हायरल…
जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर येथील नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यावेळी किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठल्याचे दृष्ट दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोेकांची तलावाजवळ गर्दी झाली.
छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते.
त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन मासे कशामुळे मृत्यू झाला त्याबाबत चौकशी करण्याचे केवळ आश्वासन दिले. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.
सोसायटीचे मैला पाणी तलावात…
शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांबुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.
त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..