दौंड, (पुणे) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार कडेठाण (ता. दौंड) येथील काशिनाथ यादवराव दिवेकर यांना प्रदान करण्यात आला. समाजभूषण पुरस्कार सोहळा जमशेद बाबा नाट्यगृह, नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी नुकताच संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य क्रीडामंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विशेष सहाय्य पुरस्कार विभागाचे सचिव सुंभत भांगे, जिल्हा परिषद माजी सदस्य लक्ष्मण दिवेकर, पत्रकार भाऊसाहेब महाडिक, माजी सैनिक ज्ञानदेव दिवेकर, दशरथ दिवेकर, सुरेश गोसावी, बाळासाहेब खोमणे प्रेमनाथ दिवेकर, आत्माराम दिवेकर, महादेव खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने समाजातील तळागाळातील जनतेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील चार वर्षे समाजात विविध स्तरावर काम करणाऱ्यांना पुरस्कार वितरित केले नव्हते.
दम्यान, ह.भ.प. काशिनाथ यादवराव दिवेकर हे वारकरी संप्रदायांचा अखंड सेवा करत असतात. परिसरातील हरिनाम सप्ताह मध्ये प्रवचन, भजन तसेच आकाशवाणी रेडिओमध्ये दर रविवारी अभंगवाणी सादर करतात. समाजातील विविध संघटनेच्या वतीने ह.भ.प. काशिनाथ दिवेकर यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.