केडगाव : कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत असलेल्या भागवत वस्ती येथे चोरीची मोठी घटना घडली. भागवतवस्ती येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरला आहे. यामध्ये 27 तोळ्यांच्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असल्याचे समजते आहे. शुक्रवारी मद्यरात्री चोरीची घटना घडली. या घटनेत अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी दोन ठिकाणी चोरी
या चोरीच्या घटनेवेळीच चोरमले वस्ती तसेच गोकुळनगर या दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यापैकी एक ठिकाणाहून तब्बल दीडशे कबूतर चोरून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी मद्यरात्री घडला आहे. चोरी करून झाल्यावर घराच्या दरवाजाची कडी लावून अज्ञात चोरटे पसार झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ दौंड रस्त्यालगत भागवत वस्ती येथे दिलीप भागवत यांचे घर आहे. बहीण आजारी असल्याने दिलीप भागवत त्यांना भेटण्यासाठी गोव्याला गेले होते. घरातील सर्व सदस्यदेखील गोव्याला गेले होते. दिलीप भागवत हे त्यांच्या फौजी हॉटेलला होते. चोरी होताना घरात कोणीही नव्हते. त्यामुळे घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले. पण, दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्यांना दरवाजा उघडता आला नाही. यानंतर त्यांनी मुख्य दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे दरवाजे तोडून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावेळी दुपारी घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी पाहणी केली. अज्ञाताविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Theft at Lakhs of worth gold theft