राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : श्री क्षेत्र ओझर गावचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर वाळुंज यांची कन्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास वाळुंज यांची नात साजिरी शेखर वाळुंज हिने राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हा व राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल बुद्धीबळ स्पर्धेत प्रवेश करण्याची संधी पटकावली.
साजिरीला आई-वडील, आजोबा-आजी, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली जागडे, अजिंक्य पिंगळे, संगीता शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. (Junnar News) त्याचप्रमाणे डॅफोडील्स हाय पब्लिक स्कूल, भांडुप (मुंबई) या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनीही साजिरीला सहकार्य केले.
ओझरकर ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा
पुण्यातील विद्या व्हॅली स्कूल याठिकाणी ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणीही साजिरीने अव्वल यश संपादन केले. या वेळी मुंबईच्या पुढील पाच कन्या महाराष्ट्र राज्याचे बुद्धीबळ स्पर्धेचे नेतृत्व करणार आहेत.
१) साजिरी शेखर वाळुंज २) त्रिशा अंशुमन जगताप ३) प्रिशा विवेक केशर वाणी ४) साईना रंजन नागरकट्टे ५) संप्रिती कुंदू
मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी झालेला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील साजिरीने अव्वल यश संपादन केले आहे. या पाचही कन्यांचे भारताचे जागतिक दर्जाचे बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ठाणे येथे विशेष सत्कार करण्यात आला.(Junnar News) दिवसातले दोन तास साजिरी बुद्धीबळाचा सराव करत असते. हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत अव्वल यश संपादन होवो, यासाठी ओझरकर ग्रामस्थांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : क्रांती दिनानिमित्त भागुबाई पिंगळे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..