Junnar News : जुन्नर : रात्रीच्या वेळी घरात लागलेल्या आगीच्या धुरामुळे माजी सरपंचांसह पत्नीचा गुदमरुन मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आपटाळे साबळेवाडी (ता. जुन्नर) येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर या घटनेमुळे जुन्नर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
माजी सरपंच मारुती भाऊ साबळे (वय-८३) व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे (वय-७३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
आपटाळे, साबळेवाडी येथील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. (Junnar News) रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपी गेले.
दरम्यान, रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. (Junnar News) तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली असता, आग विझवण्यासाठी दोघांनी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडलाने दोघांना श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. आणि त्यातच त्या दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Junnar News) पोलिसांनी सदर घटनेची ग्रामस्थांकडून माहिती घेतली आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या