शुभम वाकचौरे
Junnar News : जांबूत : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने दुचाकी चोरट्यांच्या टोळीला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरट्यांनी ओतूर, रांजणगाव, आळंदी तसेच अहमदनगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६८ हजार २१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
आशिष ढवळू भले (वय २३, रा. डिंगोरे, ता. जुन्नर), किशोर सुरेश काळे (वय २१, रा. भोजदरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) आणि शिवाजी पोपट कातवरे (वय २१, रा. जांबूत, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोर तरुणांची नावे आहेत.
दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.(Junnar News) त्यानुसार बुधवारी (ता. २५) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस जवान अक्षय नवले, निलेश सुपेकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना आशिष भले हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह मोटरसायकलची विक्री करण्यासाठी रोहकडी (ता. जुन्नर) येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावत. वरील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकींबाबत चौकशी केली असता, त्यांनी ओतूर, रांजणगाव, आळंदी तसेच अहमदनगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. (Junnar News) त्यांच्याकडून सहा दुचाकींसह ३ लाख ६८ हजार २१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांवर जुन्नर तालुक्यातील ओतूर, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, संगमनेर तालुक्यातील लोणी व अकोले येथील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : नागरिकाचे गहाळ झालेले मोबाईल ओतुर पोलीसांनी केले परत
Junnar News : नारायणगाव पोलिसांच्या तत्परतेने चोरीचा मोबाईल हस्तगत; दोघांना अटक