राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर : शालेय शिक्षण मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. विविध शैक्षणिक कार्यक्रमांमधून मुले पोषण, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींबद्दल लहान वयातच खूप काही शिकत असतात. मुलांनी कोणताही तणाव न घेता, आनंदाने शिकत रहावे, असा मूलमंत्र अभिनव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या तुपे यांनी विद्यार्थ्यांना दिला. काही वर्षांपूर्वी नाट्यवाचन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी म्हणून समोर बसलेली असायचे, आज त्याच स्पर्धेची प्रमुख पाहुणी म्हणून येताना आनंद वाटला, असे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे उद्घाटन
मातृभाषा अध्यापक संस्था (पुणे) आणि मराठी एकीकरण समिती (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Junnar News) या वेळी तुपे बोलत होत्या. मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मातृभाषा अध्यापक संस्था विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व नटराज पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थीउपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अभिनव विद्यालय, कर्वे रोड या शाळेचा विद्यार्थी निषाद साने याच्या नांदी गायनाने झाली. मातृभाषा अध्यापक संस्थेच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. संस्थेच्या कार्याचा जगन्नाथाचा रथ चालवताना जे जे हातभार लावतात त्या सर्वांचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनव विद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी व्यवहारे हिने केले.(Junnar News) पर्यवेक्षिका वंदना आणेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कोषाध्यक्ष निलम गीताभारती यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मराठी भाषा संवर्धन व विकास यासाठी अहोरात्र कार्यरत रहाणारे संस्थेचे सल्लागार हनुमंत कुबडे यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि नाटकांमधून काम करणाऱ्या रंगकर्मी मंजुषा जोशी, नाट्यकर्मी शंकर घोरपडे, लिनी फडके, कल्याणी कुलकर्णी, राधा रांगोळे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमास म.ए.सो. भावे स्कूलचे पर्यवेक्षक जायभाय व प्रमोद कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. (Junnar News) मातृभाषा अध्यापक संस्थेच्या सचिव संध्या माने, उपसचिव वंदना आणेकर, कार्याध्यक्षा शामला पंडित, सुरेखा लेंभे, संचालक शारदा पानगे उपस्थित होते. वंदना आणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : राजूर येथे जागतिक हृदय रोग दिनी शंभर रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब तपासणी