पुणे : सिंधुदुर्ग येथून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस दलात पोलीस अधिकारी असल्याचे दाखवत पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती करतो असे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संदीप गुरव यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सद्या सेवानिवृत्त आहेत. २०२२ मध्ये ते पत्रादेवी चेकपोस्टवर कर्तव्यावर असतांना त्यावेळी आरोपी हा गोव्याला जात असताना त्यांनी त्याच्या गाडीवरील चेकपोस्टर वाचून वाहन थांबवून चौकशी केली. तेव्हा आरोपीने स्वतःची ओळख डॉ. संदीप गुरव, कोल्हापूर, पी.एस.आय. अशी करुन देत विश्वास संपादन केला.
दरम्यान, संदीप यांनी फिर्यादीची कौटुंबिक माहीती घेतली आणि तुमच्या मुलाला पोलीस शिपाई पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांना आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी टप्याटप्याने आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६,४७,०००/- रोख व चेक स्वरुपात घेतले आहेत.
याबाबत, फिर्यादीने संदीप गुरव याला नोकरी विषयी विचारणा केली असता, त्याने वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली. दरम्यान, फिर्यादी जुलै २०२४ मध्ये कुटंबासह टिव्ही वरील बातम्या पाहत होते, त्यावेळी गुन्ह्यात आरोपीचा फोटो आणि नाव संदीप गुरव यास अटक करण्यात आल्याबाबत वृत्त पाहून आपली देखील नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाली आहे. असे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.