पुणे : धनकवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत अफीम तस्करातील आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील धनंजय काळभोर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अफीम तस्कर जितेंद्र देवीलाल शर्मा (रा. शेरगड, राजस्थान) याला भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने 19 एप्रिल 2024 ला अटक केली होती. पोलिसांनी आरोपीस अटक करुन आरोपी विरुद्ध दोषरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले होते. यावेळी आरोपीची रवानगी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपी जितेंद्र शर्मा याच्यावर यापूर्वी देखील राजस्थान राज्यातून अफीम तस्करी केल्याचे गुन्हे दाखल होते. आरोपी याने ॲड. आदेश चव्हाण, ॲड. धनंजय काळभोर, ॲड. विपुल अंदे, ॲड. सुलेमान शेख यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे जामीन अर्ज दाखल केला. यावेळी पोलीस, सरकारी वकील यांनी आरोपीस जामीन न मिळण्यासाठी विरोध केला. त्यांनंतर आरोपी यांचे वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. अशी माहिती ॲड. धनंजय काळभोर यांनी दिली.