Jejuri News : जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाच्या दर्शनासाठी रविवारी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. लग्न सराई तसेच उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस, मे महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात, भंडार खोबऱ्याच्या उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले. (A shout of ‘Yelkot Yelkot Jai Malhar’ at the fort; Millions of devotees took darshan of Khandobaraya)
भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी
सुगीचे दिवस सुरू होण्यापूर्वीचा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीतील शेवटचा रविवार , लग्नसराई सुरू असल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली होती. (Jejuri News ) नेहमीप्रमाणे रविवारी होणाऱ्या गर्दीपेक्षा आज भाविकांची मोठी गर्दी जेजुरीत होती. रेल्वे, एस टी बस आणि खासगी वाहनाने भाविक जेजुरीत आले होते. मुख्य महाद्वार मार्ग, जुनी जेजुरी परिसर तसेच ऐतिहासिक चिंच बाग परिसरात भाविक उतरले होते. दुचाकी, चार चाकी वाहनांनी शहरातील सर्व रस्ते जाम झाले होते. दुपार नंतर वाहनांना जेजुरी शहरात प्रवेश करणे शक्य होत नव्हते.
देव दर्शनाला आलेल्या भाविकांकडून ठीक ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले जात होते. (Jejuri News ) भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर मोठा ताण येत होता. आळंदी पंढरपूर महामार्गावर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक वारंवार खोळंबत होती. पोलीस प्रशासनाला वाहतुकीचे नियोजन करणे जिकिरीचे बनले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
Jejuri News : मार्तंड देवस्थानच्या नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, ग्रामस्थांचा रास्ता रोको
A Devotee Drowned In A Dam At Jejuri : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू
Jejuri News | एका महिलेचा डोक्यात दगड घालून केला खून : नीरा नजिकच्या थोपटेवाडीतील घटना…