उरुळी कांचन, (पुणे) : पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री लक्ष्मण चौधरी यांची सोमवारी (ता. 15) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पेठचे सरपंच तानाजी विलास चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे अष्टापूरच्या मंडल अधिकारी गीताश्री काळे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी जयश्री चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडल अधिकारी गीताश्री काळे यांनी जयश्री चौधरी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
जयश्री चौधरी यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी नूतन सरपंचांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ आण्णा चौधरी, माजी आदर्श सरपंच सुरज चौधरी, तानाजी चौधरी, उपसरपंच लक्ष्मी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी चौधरी, विजया चौधरी, शोभा चौधरी, मोनिका चौधरी, काळुराम चौधरी, रघुनाथ चौधरी, बापुसाहेब चौधरी, सोमनाथ चौधरी, काळुराम चौधरी, उद्योजक राजेंद्र आढाव, सामाजिक कार्यकर्ते सुजित चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद गुळुंजकर, उपाध्यक्ष आकाश आढाव, महादेव चौधरी, उद्योजक राजेंद्र चौधरी, तयाजी चौधरी, रामदास चौधरी आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच जयश्री चौधरी म्हणाल्या, “पेठ गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. पेठ गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”