लोणी काळभोर, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला राजा होणे शक्य नाही. शिवाजी राजांच्या काळात ज्या लढाया झाल्या, त्या सर्व इथला प्रजेला त्रास होऊ नये म्हणून स्वराज्याबाहेर झाल्या. मात्र, तिथे स्थानिक शेतकऱ्यांना या लढायांचा त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. सैन्य राजासाठी नव्हे, तर राज्यासाठी ही कृतिशील शिकवण दिली, असे शिवव्याख्याने प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगितले.
शिवजन्मोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. श्रीयश राहुल काळभोर यांनी केले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 22) पार पडला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितीन बानुगडे-पाटील बोलत होते. यशवंत सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर, राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले, राहुल मधुकर काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. सैन्य राजासाठी नव्हे, तर राज्यासाठी ही कृतिशील शिकवण दिली. स्वराज्य उभे केले पण स्वराज्य उभे करताना महाराजांनी पहिला विचार केला. राज्य उभे करणे सोपे आहे पण उभारलेले राज्य टिकवणे ते कठीण पण तितकेच महत्त्वाचे आहे. स्वराज्य चिरंतर टिकले पाहिजे. या स्वराज्याला धोका कुठून तर याला धोका जमिनीवरून नाही तर समुद्रावरून आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर आरमार उभारणारे पहिले राजे ठरले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले, दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली. सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजल्याचे शिल्प आजदेखील यादवाडला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही, याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेतली होती.
शिवा काशीद हे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बाबा गायकवाड राजेंद्र काळभोर, युवराज काळभोर, प्रियंका काळभोर, सविता लांडगे, ललिता काळभोर, प्रीतम गायकवाड, सुभाष काळभोर, अशोक मधुकर काळभोर, महेश चिले, कमलेश काळभोर, विश्वास काळभोर, अब्बा भांडवलकर , राहुल क्षीरसागर, संतोष भोसले, रमेश भोसले, राजकुमार काळभोर, प्रशांत वसंत काळभोर, नंदकुमार काळभोर, संदीप तुपे, विराज सुभाष काळभोर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे (क्रमांक व बक्षीस)
सई निलेश फलटणकर (प्रथम – सोन्याची नथ)
ऋतुजा संकेत जाधव (द्वितीय-फ्रिज)
दिव्या शरद दौंडकर (तृतीय – टीव्ही)
चित्रकला स्पर्धेतील मोठ्या गट (क्रमांक व बक्षीस)
देवांश अनिल राक्षे (प्रथम – टॅबलेट फोन) (तृतीय – टीव्ही)
प्रतीक्षा गणेश चव्हाण (द्वितीय-स्पोर्ट सायकल)
श्रीतेज पोपट फडतरे (तृतीय स्मार्टवॉच)
चित्रकला स्पर्धेतील लहान गट
सिद्धेश लालासो पाटील (प्रथम -क्रिकेट किट)
गौरी प्रदीप किन लोकल (द्वितीय – स्कूल किट)
वंश कुणाल कुऱ्हाडे (तृतीय-कलर किट)