Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. श्रीयश काळभोर यांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव साजरा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 February 2024, 21:19

लोणी काळभोर, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला राजा होणे शक्य नाही. शिवाजी राजांच्या काळात ज्या लढाया झाल्या, त्या सर्व इथला प्रजेला त्रास होऊ नये म्हणून स्वराज्याबाहेर झाल्या. मात्र, तिथे स्थानिक शेतकऱ्यांना या लढायांचा त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. सैन्य राजासाठी नव्हे, तर राज्यासाठी ही कृतिशील शिकवण दिली, असे शिवव्याख्याने प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी सांगितले.

शिवजन्मोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. श्रीयश राहुल काळभोर यांनी केले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. 22) पार पडला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितीन बानुगडे-पाटील बोलत होते. यशवंत सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर, राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले,  राहुल मधुकर काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. सैन्य राजासाठी नव्हे, तर राज्यासाठी ही कृतिशील शिकवण दिली. स्वराज्य उभे केले पण स्वराज्य उभे करताना महाराजांनी पहिला विचार केला. राज्य उभे करणे सोपे आहे पण उभारलेले राज्य टिकवणे ते कठीण पण तितकेच महत्त्वाचे आहे. स्वराज्य चिरंतर टिकले पाहिजे. या स्वराज्याला धोका कुठून तर याला धोका जमिनीवरून नाही तर समुद्रावरून आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर आरमार उभारणारे पहिले राजे ठरले आहेत.

 

तसेच ते पुढे म्हणाले, दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली. सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजल्याचे शिल्प आजदेखील यादवाडला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही, याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेतली होती.

शिवा काशीद हे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बाबा गायकवाड राजेंद्र काळभोर, युवराज काळभोर, प्रियंका काळभोर, सविता लांडगे, ललिता काळभोर, प्रीतम गायकवाड, सुभाष काळभोर, अशोक मधुकर काळभोर, महेश चिले, कमलेश काळभोर, विश्वास काळभोर, अब्बा भांडवलकर , राहुल क्षीरसागर, संतोष भोसले, रमेश भोसले, राजकुमार काळभोर, प्रशांत वसंत काळभोर, नंदकुमार काळभोर, संदीप तुपे, विराज सुभाष काळभोर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे (क्रमांक व बक्षीस)

सई निलेश फलटणकर (प्रथम – सोन्याची नथ)
ऋतुजा संकेत जाधव (द्वितीय-फ्रिज)
दिव्या शरद दौंडकर (तृतीय – टीव्ही)

चित्रकला स्पर्धेतील मोठ्या गट (क्रमांक व बक्षीस)
देवांश अनिल राक्षे (प्रथम – टॅबलेट फोन) (तृतीय – टीव्ही)
प्रतीक्षा गणेश चव्हाण (द्वितीय-स्पोर्ट सायकल)
श्रीतेज पोपट फडतरे (तृतीय स्मार्टवॉच)

चित्रकला स्पर्धेतील लहान गट
सिद्धेश लालासो पाटील (प्रथम -क्रिकेट किट)
गौरी प्रदीप किन लोकल (द्वितीय – स्कूल किट)
वंश कुणाल कुऱ्हाडे (तृतीय-कलर किट)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.