महेश तुपे
Indapur News : शहाजीनगर : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह इतर देशातील नागरिकांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच ते देश प्रगतीपथावर पोहोचले. भारतीय नागरिक अजूनही जाती-पातीच्या (beyond caste) राजकारणात अडकून पडलेले दिसत आहेत. जाती-पातीच्या पलिकडे (beyond caste) जाऊन शिवराय (Shiva Rai) समजून (Understood) घेतले, तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. असे मत शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मनोज पाटील (Manoj Patil) यांनी व्यक्त केले. (Indapur News)
शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वातींडे शिवजयंती उत्सवाचे आयोजन
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे बुधवारी (ता. १०) शिवयोद्धा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रविण पवार, निरा-भिमाचे कार्यकारी संचालक राम पाटील, सरपंच धनश्री जगताप उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रविण पवार म्हणाले की, ”ज्या युवकांकडे माँसाहेब जिजाऊंचे संस्कार, शिवाजी महाराजांची नीती आणि संभाजीराजांसारखी ताकद आहे. तो युवक जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. शहाजीनगर सारख्या ठिकाणी शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचं काम सोपे नव्हते. मात्र स्थानिक युवकांनी एकजुटीने हे काम लिलया पेलून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.”
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदानानंतर फटाक्यांची आतिषबाजीमध्ये शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले. प्रास्ताविक किसनराव खाडे यांनी केले. सूत्रसंचालन कालिदास आव्हाड यांनी केले. आभार हनुमंत चव्हाण यांनी मानले.