युनूस तांबोळी / शिरूर : १९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मतदान जनजागृती पथकाच्या माध्यमातून रांजणगाव व कारेगाव (ता. शिरुर ) येथे औद्योगिक वासहतीमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली.
१९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, निवडणूक नायक तहसीलदार डॉ सचिन वाघ, स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव व कारेगाव औद्योगिक क्षेत्रातील साऊथको इंडिया, क्लासिक प्रायव्हेट, गोलप्रिनेट इंजिनिअरिंग, होरा आर्ट प्राय लिमिटेड इ. कंपन्यांतील ७७६ कामगारांना मतदान करण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्यांच्याकडून मतदान संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. व त्यांना येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करण्यासाठी मतदान संकल्प शपथ देण्यात आली. यावेळी साउथको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एचआर विनय शर्मा, क्लासिक प्राइव्हेट कंपनीचे संदीप ढोमे, स्वीप जनजागृती पथकाचे प्रमुख सुनिल भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, सचिन तोडकर, राहुल रहाटाडे, सुरेश रोंगटे, विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, मंगेश जावळे उपस्थित होते.
आमच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना २० नोहेंबर रोजी पगारी सुट्टी देणार असून दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याची खात्री करणार आहे.
विनय शर्मा, एचआर, साउथको प्रा. ली. रांजणगाव