दीपक खिलारे
Indapur | इंदापूर : राज्यभरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे गुरुवारी दि.13 इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथील अर्ध्या एकरातील पान मळ्याचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे.
याबाबत पुणे प्राईम न्यूज प्रतिनिधी शी बोलताना नुकसानग्रस्त शेतकरी भालचंद्र येरळकर म्हणाले की…
गुरुवारी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळाने माझ्या शेतातील अर्ध्या एकरातील पानमळा, शेवगा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. लागवडीकरीता दोन लाख रुपयांचा खर्च आला होता. परंत अवकाळी पावसामुळे झाडे शेतात उन्मळून पडून शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.
यामुळे शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी असे येरळकर यांनी सांगितले. यावेळी तानाजी येरळकर, महेश येरळकर, भालचंद्र येरळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : इंदापुरातील बेळवाडीत अवकाळीने चंदन बागेचे नुकसान ; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा..!
Indapur : भिमाई आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीदिनी अभिवादन